मुंबई : राज्यात दरवर्षी वाढणारी कर्करुग्णांची संख्या, उपचारासाठी होणारी फरपट थांबवण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यात ‘आसाम कॅन्सर केअर’ प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांतील ३६ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कर्करोगावर उपचार करण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी पाच हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
त्याबाबतचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षाण विभागाने मंत्रिमंडळाकडे सादर केला आहे.
राज्यात २०२० मध्ये एक लाख १६ हजार १२१ कर्करुणा होते. ही संख्या २०२४ मध्ये एक लाख २७ हजार ५१२ एवढी वाढली आहे. पाच वर्षांत सुमारे ११ हजार ३९१ नवीन राणांची भर पडली आहे. देशात ककरूण संख्येत उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागती. राज्यात सध्या मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयातच आवश्यक सर्व उपचार होत आहेत. मात्र मोठी रुग्णसंख्या पाहता आणखी रुग्णालयांची आवश्यकता आहे. यासाठीच सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी निगडित असणाऱ्या रुग्णालयांमध्ये कर्करोगावर उपचार होणार आहेत. छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, चंद्रपूर, नागपूर, मुंबई, पुणे, धुळे, नांदेड व अकोला येथील नऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात ‘एल २’ स्तरावरील उपचार केले जाणार आहेत. ‘एल ३’ अंतर्गत २७रुग्णालयांचा समावेश आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यात कर्करोगावर उपचार होणार असल्याने रुग्णांना मोठ्या शहरात जाऊन, लाखो रुपये खर्च करण्याची वेळ येणार नाही. या महत्वकांक्षी प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची लवकरच मंजुरी मिळेल. – हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण मंत्री
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 05/Jun/2025














