दापोली : रामराजे कॉलेजचे चौदा विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र

दापोली : क्रीडा युवक व सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीड़ा अधिकारी कार्यालय व दापोली तालुका क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दापोली तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा कोकण कृषी विद्यापीठाच्या मैदानावर नुकत्याच पार पडल्या.

या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये रामराजे ज्यु. कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स दापोलीच्या एकूण १४ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली, आहे. शालेय मैदानी स्पर्धेत १९ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये ३००० मीटर धावणे प्रथम – हृषीकेश रेवाळे, द्वितीय-स्मित काष्टे, लांब उडी प्रथम विवेक पाचकले, थाळीफेक तृतीय रितेश जावळे, २०० मीटर धावणे तृतीय-सागर मोहिते, ८०० मीटर धावणे तृतीय हर्षद नितोरे, १५०० मीटर धावणे तृतीय हर्ष उजाळ, क्रॉस कंट्री प्रथम-हृषीकेश रेवाळे, द्वितीय सुजल लोखंडे आणि ५ कि. मी. चालणे प्रथम- स्मित काष्टे.

याचबरोबर १९ वर्षे वयोगटातील मुलींमध्ये ३००० मीटर धावणे, क्रॉस कंट्री व हातोडा फेक प्रथम अनुश्री आंबेकर, २०० मीटर धावणे व गोळा फेक प्रथम श्रावणी साळवी ८०० मीटर धावणे द्वितीय सलोली निवळकर, ४०० मीटर धावणे प्रथम-शीतल खळे, थाळीफेक प्रथम नंदिनी सणस, २०० मीटर धावणे द्वितीय गायत्री जोशी, हातोडा फेक द्वितीय स्वरूपा पालकर, रिले प्रथम, १०० मीटर धावणे तृतीय-ऋतुजा माने, लांब उडी तृतीय-नंदिनी सणस हे सर्व विद्यार्थी विजयी झाले.

स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या या सर्व यशस्वी खेळाडूंना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक संतोष येसावरे, प्राचार्या वेदिका राणे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे संस्थेचे संस्थापक संदीप राजपुरे, अध्यक्षा स्मिताली राजपुरे, सेक्रेटरी डॉ. सुस्मिता राजपुरे, सर्व संचालक मंडळ व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक निर्वाण यांनी विशेष अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Infigo Eyecare

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:07 PM 14/Oct/2024