रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात होणारा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार, दि. १६ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत होणार आहे, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे सदस्य सचिव यांनी कळविले आहे.
लोकशाही दिनाला अर्जदार महिला स्वतः उपस्थित राहून निवेदन सादर करतात. त्याअनुषंगाने जिल्हा स्तरावरील संबंधित अधिकारी यांना महिलांचे वैयक्तिक प्रश्नाबाबत कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात येतात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:54 PM 12/Jun/2025
