रत्नागिरी, दि. १२ (जिमाका): रत्नागिरी जिल्ह्यासाठी प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी १३ ते १५ जून या कालावधीसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. या काळात जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे.
आज, १२ जून रोजी ‘यलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला असून, ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तर, १३ जून रोजी काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस, विजा चमकणे आणि ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना आणि दक्षता:
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खालील दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे:
१. विजा चमकत असताना घ्यायची काळजी:
संगणक, टीव्ही यांसारखी विद्युत उपकरणे बंद करून स्त्रोतांपासून अलग ठेवावीत.
दूरध्वनी आणि भ्रमणध्वनीचा वापर टाळावा.
विजा चमकत असताना घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
विजेच्या खांबांपासून तसेच उंच झाडांखाली आश्रय घेऊ नये.
मोकळ्या परिसरात असल्यास गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे.
धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात.
विजा पडण्याची पूर्वसूचना मिळवण्यासाठी आपल्या मोबाईलवर ‘दामिनी ॲप’ डाऊनलोड करून घ्यावे.
२. मुसळधार पावसात घ्यायची दक्षता:
आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा.
घराबाहेर किंवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी थांबावे.
अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी राहा आणि पायी अथवा वाहनाने प्रवास करणे टाळा.
घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास, निघण्यापूर्वी हवामान, रेल्वे, रस्ते वाहतूक आणि पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती अधिकृत स्त्रोतांकडून घ्या.
अफवांवर विश्वास ठेवू नका!
कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि त्या पसरवू नका. मिळालेल्या बातमीची खात्री भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in/ या संकेतस्थळावरून किंवा खालील अधिकृत नियंत्रण कक्षांवर संपर्क साधून करून घ्या.
आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी संपर्क क्रमांक:
जिल्हा नियंत्रण कक्ष (रत्नागिरी): ०२३५२-२२२२३३ / २२६२४८
जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष: ०२३५२-२२२२२२
पोलीस टोल फ्री हेल्पलाईन: ११२
जिल्हा रुग्णालय: ०२३५२-२२२३६३
महावितरण, रत्नागिरी नियंत्रण कक्ष: ७८७५७६५०१८
तालुका नियंत्रण कक्ष (दूरध्वनी क्रमांक):
रत्नागिरी: ०२३५२-२२३१२७
लांजा: ०२३५१-२३००२४
राजापूर: ०२३५३-२२२०२७
संगमेश्वर: ०२३५४-२६००२४
चिपळूण: ०२३५५-२५२०४४ / ९६७३२५२०४४
खेड: ०२३५६-२६३०३१
दापोली: ०२३५८-२८२०३६
गुहागर: ०२३५९-२४०२३७
मंडणगड: ०२३५०-२२५२३६
नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून आपत्ती टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:09 12-06-2025
