निवे बुद्रूक येथे सव्वाशे वर्षांपूर्वीचा पिंपळ वृक्ष उन्मळून पडला

देवरुख : देवरुख-रत्नागिरी मार्गावरील निवे बुद्रुक याठिकाणी सव्वाशे वर्षांपूर्वीचे जुने पिंपळाचे झाड मंगळवारी सकाळी पडल्यामुळे हा मार्ग अर्ध्या तासासाठी बंद झाला होता. स्थानिक ग्रामस्थांनी पिंपळाच्या फांद्या तोडून एकेरी वाहतूक सुरू केली.

सकाळी ८.३० च्या सुमारास निवे गावातील सहाणेजवळील जुने पिंपळाचे झाड उन्मळून पडले. हे झाड देवरुख-रत्नागिरी मुख्य मार्गावरच पडल्यामुळे मार्ग बंद झाला होता.

पिंपळाचे झाड पडल्याची माहिती मिळताच गावातील महेश विभूते, रवींद्र राजवाडे, बाबू विभूते, संतोष जोशी, संदीप गावणकर यांनी कोयतीच्या सहाय्याने मार्गावरील झाडाच्या पडलेल्या फांद्या तोडून बाजूला करत एकेरी वाहतूक सुरू करून दिली. यामुळे हा मार्ग अर्ध्या तासातच सुरळीत सुरू झाला. ग्रामस्थांनी केलेल्या प्रयत्नामुळे हा मार्ग सुरू झाल्यामुळे वाहन चालकांनी समाधान व्यक्त केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 18/Jun/2025

Infigo eyecare