खेड तहसील कार्यालयावर कुणबी समाजोन्नती संघाची धडक

खेड : मराठा समाजाचा सगेसोयरे अध्यादेशाला विरोध करण्यासाठी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई या मातृसंघटनेने दिलेल्या सूचनेनुसार कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा खेड ग्रामीणच्या वतीने सोमवार, दि.१४ रोजी सकाळी ११ वाजता येथील तहसीलदार कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले. याबाबतचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाच्या दबावतंत्राला बळी पडून सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढून त्याचे कायद्यात रूपांतर नको व मराठा समाजाला कुणबी दाखले देणे बंद करा, अशी आमची मागणी आहे. यावेळी तहसीलदार सुधीर सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पाठवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी कुणबी समाज बांधव, विविध संघटनांचे अध्यक्ष कुणबी समाजाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आंदोलनात सहभागी झाले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 15/Oct/2024

Naadi pariksha