रत्नागिरी : ‘जिल्हा नियोजन’च्या २२५ कोटींच्या विकासकामांना मंजुरी

रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितीला २०२४-२५ या आर्थिक वर्षांसाठी ३६० कोटीचा विकास आराखडा मंजूर झाला. त्यापैकी सात महिन्यांत आतापर्यंत सख्या २०० कोटींच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्याचा निधी काही प्रमाणात वितरित केला आहे. यातील ३३ टक्के निधी जिल्हा परिषदेला वर्ग करण्यात आला. विधानसभेची आचारसंहिता मंगळवारी लागू झाल्याने असल्याने उर्वरित ११० कोटींचा निधी नवीन सत्ताधाऱ्यांना विकासकामासाठी वापरता येणार आहे.

गेल्या वर्षी जूनमध्ये राज्यात सत्तांतर झाले. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. पालकमंत्री सामंत यांच्या सूचनेनुसार, संपूर्ण जिल्ह्याच्या कामांचा एकत्रित आराखडा सुमारे ८०० कोटी रुपयपिक्षा अधिकचा तयार करण्यात आला. एकत्रित आराखडा विचारात घेऊन शासनाकडून निधी देण्यात येत नाही. त्यामुळे त्यापैकी ३६० कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी दिली. यामध्ये जिल्ह्यात साकव उभारणीसह पर्यटन, रस्ते, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आदींसाठी जिल्हा नियोजन विकास आराखड्याला प्राधान्य देण्यात आले आहे. सिंधुरत्न योजनेसाठी काही कोटी निधी मंजूर झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर पुन्हा विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागणार होती. त्यामुळे जास्तीत जास्त विकासकामांना प्रशासकीय मंजुरी देण्यावर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचा भर होता. त्यानुसार जिल्हा नियोजनमधून आतापर्यंत २२५ कोटींच्या विकासकामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी ३.५० कोटी
महायुती शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात आणली आणि ती प्रचंड लोकप्रिय झाली. या योजनेने महिलांना चांगलेच आकर्षित केले आहे. या योजनेच्या प्रसिद्धीसाठी घेण्यात आलेल्या मेळाव्यांवर ३ कोटी ४२ लाख रुपये निधी खर्च करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 16/Oct/2024

Shree clinic