रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालय स्थलांतराचा प्रस्तावच नाही : उदय सामंत

रत्नागिरी : इंग्रजांच्या काळापासून रत्नागिरीत सुरू असलेले प्रादेशिक मनोरुग्णालय हे राज्यामध्ये प्रथम १४ कोटी रूपये निधीतून अपग्रेड करण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजनही झाले आहे. त्यामुळे कोल्हापुरातील जयसिंगपूर उदगाव येथे स्थलांतरित करण्याच्या हालचाली शासन मान्यतेने सुरू झाल्याचा कोणताही प्रस्तावही आरोग्य विभागाकडे नाही. याबात चुकीची माहिती देणाऱ्यावर १०० टक्के कारवाई करण्यात येईल, असे राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

राज्य शासन स्तरावरून काढण्यात आलेल्या त्या अधिसूचना पत्र आकृतीबंधानुसार मंजूर असलेली पदे उदगाव येथील ३६५ खाटांच्या प्रादेशिक मनोरूग्णालयासाठी वर्ग करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे मनोरुग्णालय बंद शक्यता करण्यात प्रादेशिक व्यक्त आली. रत्नागिरीतील मनोग्णालय रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांसाठी आहे. रुग्णालयास सुमारे ३६५ खाटांची मंजुरी आहे. कोल्हापूर, सांगली च सातारा आणि सीमाभागातील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मनोरुग्णालयात पुणे किंवा रत्नागिरी येथे जावे लागते. त्यामुळे गेली अनेक वर्षे कोल्हापूरमध्ये मनोरुग्णालय व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू होते.

नातेवाईकांची अनेक वर्षांपासूनची मागणी लक्षात घेत कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे रत्नागिरीच्या धर्तीवर ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरूग्णालय स्थापन करण्याबाबतच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाची मान्यता असल्याचे अधिसूचना पत्र काढण्यात आले. त्या पत्रामुळे रत्नागिरीत पडसाद उमटले. रत्नागिरी येथील रुग्णालय स्थलांतरित होऊ नये अशी मागणी जोर धरली आहे. या बाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, रत्नागिरी प्रादेशिक मनोरूग्णालयाचे यापूर्वीच शासनाकडून मंजूर १४ कोटींच्या निधीतून अपग्रेडेशन केले जाणार आहे. त्या कामाचे भूमिपूजनही करण्यात आले. पण हे मनोरूग्णालय रत्नागिरीतून कोल्हापूर येथे स्थलांतरित करण्याचा राज्याच्या आरोग्य विभाग आयुक्तांनी प्रस्तावच नसल्याचे स्पष्ट केल्याची माहिती सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. मात्र त्या बाबतचे अधिसूचना पत्रात मोठा संभ्रम निर्माण करण्यात आला आहे. ज्यांने हे अधिसूचना पत्र काढून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय, त्यावर १०० टक्के कारवाई करण्यात येईल, असे सामंत यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 17/Oct/2024

Shanti2