‘आपले सरकार सेवा केंद्र’ देताना नियमांची पायमल्ली : अमित पडवळ

राजापूर : आपले सरकार सेवा केंद्रासाठी स्थानिकांची मागणी असतानाही स्थानिक नसलेल्या व ४० किमी दूर राहणाऱ्या व्यक्तीला दोनिवडे येथे आपले सरकार सेवा केंद्र दिले गेल्याचा प्रकार राजापुरात घडला आहे. दोनिवडे येथे आपले सेवा सरकार केंद्र देताना सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले असून, त्याची सखोल चौकशी करून कारवाई व्हावी अशी मागणी दोनिवडे येथील अमित पडवळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

या वेळी संबंधितांकडून महा ई-सेवा केंद्रासाठी अर्ज करणारा नागरिक हा त्या गावातील रहिवासी असावा. जर त्या गावातील नागरिकाचा अर्ज आला नसेल तर जवळच्या गावातील रहिवासी असलेल्या अर्जाचा विचार करण्यात येईल, या अटींचा भंग करत केंद्र दिले गेले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ६ डिसेंबर २०२४ रोजी प्रसारित झालेल्या जाहिरातीनुसार, आपले सरकार सेवा केंद्रासाठी १७ डिसेंबर २०२४ रोजी आहे. त्यानंतर विस्तार अधिकारी कोंड्येतर्फे सौंदळ यांनी २५ एप्रिल २०२५ रोजी स्वतः येऊन माझ्या सीएसी केंद्राची पडताळणी केली. या पडताळणीनंतर आपल्या कार्यालयाच्या आपले सरकार सेवा केंद्राच्या अंतिम यादीमध्ये स्थानिक असूनही मला
प्राधान्य दिले गेले नाही. मात्र, दोनिवडेपासून ४० किमी अंतरावर असलेल्या सोलगाव येथे राहणाऱ्या व्यक्तीच्या नावे आपले सरकार सेवाकेंद्राचा आयडी देण्यात आला आहे.

या वेळी संबंधितांकडून महा ई-सेवा केंद्रासाठी अर्ज करणारा नागरिक हा त्या गावातील रहिवासी असावा. जर त्या गावातील नागरिकाचा अर्ज आला नसेल तर जवळच्या गावातील रहिवासी असलेल्या अर्जाचा विचार करण्यात येईल, या अटींचा भंग करत केंद्र दिले गेले आहे

तालुक्यातील दोनिवडे या गावासाठी अर्ज केलेला
एका कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती महा ई-सेवाकेंद्रासाठी अर्ज करू शकतो. त्याच्या कुटुंबातील दुसरा अर्ज प्राप्त झाल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही. ही अटही डावलण्यात आली आहे. दोन्ही सख्ख्या भावांना आयडी मिळणे हे आपल्या जाहिरातीमधील वरील मुद्द्याची पायमल्ली केली, असा दावा करत संबंधिताप्रकरणी चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी पडवळ यांनी लेखी पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:18 PM 22/Jul/2025