रत्नागिरी : कोकण निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. येथे आंबा, काजुसह मासेमारी हे प्रमुख व्यवसाय चालतात. परंतु येथील तरूणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी येथे उद्योग येणे आवश्यक आहे.
देश, राज्याच्या तुलनेत गेल्या 30 ते 35 वर्षातरत्नागिरी जिल्ह्यात ॲस्ट्रॉसिटीच्या केवळ 305 केसेस दाखल झाल्या आहेत. यावरून रत्नागिरीत सामाजिक न्यायाचा सलोखा उत्तम असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले. तर ’वेळ आली तर देईन माझी जान, कोणालाही बदलू देणार नाही देशाचे संविधान’ या शायरीने ना.आठवले यांनी भाषणाला सुरूवात केली. रिपब्लिकन पाट ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने ना.रामदास आठवले यांची तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्याबद्दल जिल्ह्याच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ना.आठवले बोलत होते.
रिपब्लिकन पाट ऑफ इंडिया हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पक्ष आपण चालवत आहोत
जिल्ह्याच्या वतीने भव्य पुष्पहार घालून आकर्षक सन्मानचिन्हाने ना.आठवले यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना ना.आठवले म्हणाले, रिपब्लिकन पाट ऑफ इंडिया हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पक्ष आपण चालवत आहोत.महाराष्ट्रासहीत देशातील 35 हून अधिक राज्यांमध्ये आरपीआय सक्रीय आहे. पक्ष छोटा असला तरी माणसं जमतात. मी सत्तेत सहभागी असलो तरी स्थानिक पातळीवर सत्तेचा वाटा मिळत नाही ही वस्तुस्थिती असली तरी बाबासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविणे हे एकमेव आपले ध्येय आहे. देशातील सर्वसामान्य नागरिक माझ्यासोबत आहेत. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल तिसऱ्यांदा आपल्याला मंत्रिपदाची संधी दिल्याचे ना.आठवले यांनी सांगितले.
मरेपर्यंत मी आरपीआयचे नाव पुसू देणार नाही
आरपीआयमार्फत मी एकमेव राज्यसभेचा खासदार आहे. माझ्या पक्षाला सभागृहात बोलायला कमी वेळ मिळतो म्हणून मी शायरीच्या माध्यमातून कमी शब्दात माझ्या भावना सभागृहात मांडत असतो. काहींना ते पटत नाही. परंतु मला पटते ते मी करतो, असे ना. आठवले यांनी सांगितले.आरपीआयच्या माध्यमातून दिल्ली दरबारी बाबासाहेबांचे विचार मांडण्याचे काम आपण करत असतो व मरेपर्यंत मी आरपीआयचे नाव पुसू देणार नाही. अनेकजण पक्ष बदलतात, पक्षांची नावे बदलतात. परंतु रामदास आठवले अखेरपर्यंत आरपीआयमध्येच दिसेल. काँग्रेसकडून संविधान बदलाचा अपप्रचार केला गेला. परंतु बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान कोणीही बदलणार नसल्याचे ना.आठवले यांनी स्पष्ट केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 21-09-2024