रत्नागिरी : जिल्ह्यात ५२ हजार ३२६ दुधाळ जनावरांची नोंद

रत्नागिरी : जिल्ह्यातील पशुधन विकास आणि दूध उत्पादनवाढीसाठी पशुसंवर्धन विभागाने केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. जिल्ह्यात ५२ हजार ३२६ दुधाळ जनावरांची नोंद असून, त्यामध्ये संकरित पशुधनाचा वाढता वाटा महत्त्वाचा आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ५२ हजार ३२६ दुधाळ जनावरे होती. त्या जनावरांमध्ये विविध प्रकारच्या गाई आणि म्हशींचा समावेश आहे. देशी प्रजातींसोबतच विदेशी आणि संकरित जातींच्या जनावरांची संख्या जिल्ह्यात वाढत आहे. २०१९-२०च्या नोंदीनुसार, संकरित गाई ६ हजार ७०१ आणि अंगीकृत गाई २९ हजार ४६ यांची मोठी संख्या हे जिल्ह्याच्या दुग्धोत्पादन वाढीसाठी महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. अंगीकृत म्हशींची संख्या ११ हजार ७ असून, ती लक्षणीय आहे. जिल्ह्यातील पशुधन विकास आणि दूध उत्पादनवाढीसाठी पशुसंवर्धन विभाग कार्य करत आहे.

सध्या म्हशीच्या दुधाचे उत्पादनही जिल्ह्यात वाढत आहे. संकरित आणि अंगीकृत जातीच्या जनावरांमध्ये दूध उत्पादन क्षमता अधिक असते. त्यामुळे या जनावरांच्या वाढत्या संख्येमुळे रत्नागिरी जिल्ह्यात एकूण दुधाचे उत्पादन वाढण्यास मोठी मदत होणार आहे, ज्यामुळे पशुपालकांना अधिक आर्थिक लाभ मिळतो. ही वाढ जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 PM 31/Jul/2025

Ratnagiri Khabardar add image