Ratnagiri : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

रत्नागिरी : जिल्ह्यात बुधवारी (ता. १३) दिवसभर पावसाच्या जोरदार सरी पडत होत्या. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाकडूनही पुढील दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवली आहे तसेच समुद्रकिनारी भागात मच्छीमारांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

बुधवार सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासात सरासरी १५.९६ मिमी नोंद झाली. त्यात मंडणगड ७.२५ मिमी, खेड २३.१४, दापोली २१, चिपळूण २६.६७, गुहागर ७.८०, संगमेश्वर १४.५०, रत्नागिरी १३.११, लांजा १४.२०, राजापूर १६ मिमी पाऊस झाला. शनिवारी दिवसभर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला होता. त्यानंतर पुन्हा दिवसा कडकडीत ऊन पडलेले होते. अधूनमधून एखादी सर पडून जात होती. अनियमित पावसाचा परिणाम भातशेतीवर होण्याची भीती वर्तविली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 14/Aug/2025