देवरुख : धामणी ग्रामपंचायतीने केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या संकेतस्थळावर दाखल केलेले फोटो व माहिती खोटी तसेच दिशाभूल करणारी असून शासनाची फसवणूक करणारी आहे. याबाबत प्रशासनाकडून कोणतीच कारवाई न झाल्यामुळे धामणी गावातील प्रवीण गुरव हे स्वातंत्र्य दिनापासून आमरण उपोषणाला बसणार आहेत.
गुरव यांनी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. त्याची दखल घेत संगमेश्वर गटविकास अधिकाऱ्यांना धामणी ग्रामपंचायतीला प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी करण्याचे आदेश दिले. मात्र, याबद्दल आजपर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याने गुरव यांनी स्वातंत्र्यदिनी उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 15/Aug/2025












