रत्नागिरी : जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत जिल्हास्तरावर पहिला क्रमांक मिळवणाऱ्या ग्रामपंचायतीला ५० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकासाठी अनुक्रमे ३० व २० लाख रुपयांची बक्षीसे आहेत. राज्यस्तरावर या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामविकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करेल, त्यावर जिल्हा व विभागस्तरीय समिती नियंत्रण ठेवणार आहे. पुरस्कारासाठी ग्रामपंचायतीचे मूल्यमापन करण्याची जबाबदारी तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय समितीवर आहे. लोकाभिमुख प्रशासन व सुशासन, पंचायत सेवांमध्ये पारदर्शकता, माती, पाणी, स्वच्छता व जैवविविधतेचे व्यवस्थापन, सक्षम शाळा, सक्षम अंगणवाडी व सक्षम प्राथमिक आरोग्य केंद्र ही संकल्पना राबविणे, ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे ही कामे या अभियानात केली जातील.
तालुकास्तरीय मूल्यमापन ११ ते २६ जानेवारी २०२६ दरम्यान होईल. जिलास्तरीय मूल्यमापन २८ जानेवारी ते १५ फेब्रुवारी, विभागस्तरीय मूल्यमापन १७ ते २७फेब्रुवारी आणि राज्यस्तरीय मूल्यमापन मार्च २०२६ मध्ये होणार आहे.
तालुकास्तरावर विजेत्या पहिल्या तीन क्रमांकांच्या ग्रामपंचायतींना १५ लाख, १२ लाख व ८ लाख रुपयांची बक्षीसे मिळतील. पाच लाख रुपयांची दोन विशेष पारितोषिकेही असतील, जिल्हास्तरावरील पहिल्या तीनविजेत्या ग्रामपंचायतींना ५० लाख, ३० लाख व २० लाख रुपयांची बक्षीसे आहेत.
जिल्हा परिषद, पंचायत समितीस्तरावरही अभियान पंचायत
समित्यांसाठी विभागस्तरावर १ कोटी ७५ लाख ६० लाखांची बक्षीसे आहेत. राज्यस्तरावर २ कोटी, १.५० कोटी व १.२५ कोटीची बक्षीसे आहेत. जिल्हा परिषदाना राज्यस्तरावर ५ कोटी, ३ कोटी व २ कोटी रुपयांची बक्षीसे मिळतील.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:57 PM 10/Sep/2025













