दापोली : दापोली तालुक्यातील असोंड गावातील स्वकष्टाच्या गट नं. ५४६ या मिळकतीत राजाराम रसाळ यांचे सातबाऱ्यावर नाव लावण्यास येथील तलाठी टाळाटाळ करत असल्याने शहीद हुतात्मा काशिनाथ रसाळ यांचे वयोवृद्ध वडील वासुदेव रामा रसाळ यांच्यासह कुटुंबिय उपोषणास बसले होते. या उपोषणाची दापोली तहसीलदार अर्चना बोंबे यांनी तत्काळ दखल घेऊन राजाराम रसाळ यांचे नाव सातबाऱ्यावर लावले जाईल आणि त्याचा फेरफार हा चार दिवसात करून दिला जाईल असे लेखी पत्र रसाळ यांना दिले.
जाधव यांनी पाठिंबा दर्शवला होता. यावेळी तलाठी, मंडळ अधिकारी यांनाही तहसीलदारांनी समज दिली. यामुळे रसाळ यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला आहे. या उपोषणाला उद्धव ठाकरे पक्षाचे दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, तालुका सचिव नरेंद्र करमरकर माजी सैनिक सुरेश जाधव यांनी पाठिंबा दर्शवला होता
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 PM 19/Aug/2025












