रत्नागिरी : तालुक्यातील पावस- तांबळवाडी येथे वृध्दाने अज्ञात कारणातून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवार, १८ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वा. सुमारास घडली. भिकाजी रंगराव रसाळ (६०, रा. पावस-तांबळवाडी, रत्नागिरी) असे गळफास घेतलेल्या वृध्दाचे नाव आहे.
सोमवारी दुपारी त्यांनी राहत्या घराच्या दोन्ही दरवाजांना आतून कड्या लावून घेत छताच्या लोखंडी बारला नायलॉन दोरीने बांधून गळफास घेतला. या बाबत पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 AM 20/Aug/2025












