रेल्वे प्रवासात प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी : सीएसटी मेंगलोर रेल्वेने प्रवास करणाऱ्या मालवण येथील प्रौढाची तब्येत अचानक बिघडली. बेशुद्धावस्थेत त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

संजय गोपाळ कोळंबकर (वय ४७, रा. मिऱ्याबांध-मालवण, जि. सिंधुदुर्ग) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १८) सकाळी घडली. शहर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 20/Aug/2025