दापोली : हर्णे बंदरात शुकशुकाट

दापोली : तालुक्यात गेले ५ ते ६ दिवस अतिवृष्टी आणि वादळासदृश परिस्थितीमुळे हर्णे बंदरात शुकशुकाट आहे. वादळी परिस्थितीमुळे नौका रत्नागिरी बंदर, जयगड खाडीत, तर मोजक्या नौका हर्णे बंदर आणि आंजर्ले खाडीत आसरा घेत आहेत; परंतु जयगड खाडीत मात्र उभ्या करून देण्यास तेथील मच्छीमारांना मज्जाव केला जात असल्याचे येथील मच्छीमारांनी सांगितले.

१ ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात झाली. ५० नौकांनी पहिल्या दिवशी मुहूर्त साधला. त्यानंतर मासळी मिळायला लागली; परंतु दरात गोंधळ होऊ लागला. मासळी भरपूर तर दर कमी काहीच परवडण्यासारखे नव्हते. १४ ऑगस्टपासून सुरू झालेल्या अतिवृष्टी आणि वादळामुळे मासेमारीला गेलेल्या नौका रत्नागिरी बंदर, तर जयगड खाडीमध्ये आसऱ्याला थांबल्या.

वादळासदृश परिस्थिती निर्माण झाली म्हणून आम्ही आमच्या नौका जयगड खाडीत घुसवल्या तर तेथील स्थानिकांनी आम्हाला मज्जाव करायला सुरुवात केली. खलाशांना उतरूदेखील देत नाहीत-महेंद्र चोगले, मच्छीमार, हर्णे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 20/Aug/2025

Shanti 4