कोलाड येथून पहिली रो-रो सेवा आजपासून

रत्नागिरी : गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी कोकण रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवासी आणि वाहनचालकांच्या मागणीचा विचार करून रोल-ऑन/रोल-ऑफ (रो-रो) कार वाहतूक सेवेच्या नोंदणीची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. पहिली रो-रो सेवा शनिवारी (दि. २३) कोलाड येथून सुरू होणार आहे. या सेवेसाठीची नोंदणीची अंतिम मुदत २२ ऑगस्टपर्यंत होती. तसेच दि. १ पर्यंत रो-रो सुविधा आहे.

नियोजित सर्व रो-रो फेरींसाठी प्रवासाच्या तारखेच्या तीन दिवस आधीपर्यंत (प्रवासाची तारीख वगळून) सायंकाळपर्यंत नोंदणी करता येईल. उदाहरणार्थ, १ सप्टेंबरच्या फेरीसाठी २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

जर एखाद्या प्रवासासाठी आवश्यक इतकी नोंदणी झाली नाही, तर ती फेरी रद्द केली जाईल. मात्र, आधीच नोंदणी केलेल्या ग्राहकांना तत्काळ कळवले जाईल आणि त्यांचे पूर्ण शुल्क परत केले जाईल, असे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे. अधिक माहिती www.konkanrailway.com

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 23/Aug/2025