रत्नागिरी : शहरातील उद्यमनगर येथील १०वीतील मुलाने परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री ८ वा. सुमारास घडली. रेहान असलम कापडे (१५, रा. स्वामी समर्थ अपार्टमेंट बाष्टे कपाउंड उद्यमनगर, रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत त्याचा मामा अश्रफ अली ईसाक पागारकर (६५, रा. एमजी रोड भाजी मार्केट, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.
त्यानुसार, त्यांची बहिण नसरीन आसलम कापडे यांचा मुलगा रेहान हा १०वीत शिकत होता. त्याला परीक्षेत कमी मार्क मिळाल्यामुळे त्याची आई त्याला ओरडली होती. त्यामुळे शनिवारी रात्री रेहानने रुममधील पंख्याला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यानी रेहानला तपासून मृत घोषित केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:02 AM 25/Aug/2025














