Ganpati Special Trains 2026: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी पश्चिम रेल्वेच्या विशेष गाड्यांची घोषणा!

रत्नागिरी, सावंतवाडी, ठोकूर मार्गावर धावणार अतिरिक्त फेऱ्या

रत्नागिरी, १५ ऑगस्ट:

Ganpati Special Trains 2026 अंतर्गत आगामी गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने अतिरिक्त गाड्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या संदर्भातील अधिकृत प्रसिद्धीपत्रक रेल्वे प्रशासनातर्फे १३ ऑगस्ट २०२६ रोजी जारी करण्यात आले असून, या विशेष गाड्यांचे तिकीट बुकिंग आजपासून अधिकृतपणे सुरू झाले आहे. मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, बडोदा, विश्वामित्री, उधना आणि वलसाड येथून कोकणातील रत्नागिरी, सावंतवाडी आणि ठोकूर या स्थानकांसाठी या फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

अतिरिक्त गणपती स्पेशल गाड्यांचे संपूर्ण वेळापत्रक आणि फेऱ्यांचा तपशील

पश्चिम रेल्वेने जाहीर केलेल्या विशेष गाड्यांची यादी, त्यांचा मार्ग आणि फेऱ्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे:

ट्रेन क्रमांक व मार्गप्रवासाची तारीखएकूण फेऱ्या
ट्रेन क्र. 09013 (मुंबई सेंट्रल ते ठोकूर)०८/०९/२०२६१ फेरी
ट्रेन क्र. 09014 (ठोकूर ते मुंबई सेंट्रल)०९/०९/२०२६१ फेरी
ट्रेन क्र. 09019 (मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी)०९/०९/२०२६१ फेरी
ट्रेन क्र. 09020 (सावंतवाडी ते मुंबई सेंट्रल)१०/०९/२०२६१ फेरी
ट्रेन क्र. 09035 (वांद्रे टर्मिनस ते रत्नागिरी)१०/०९/२०२६१ फेरी
ट्रेन क्र. 09036 (रत्नागिरी ते वांद्रे टर्मिनस)११/०९/२०२६१ फेरी
ट्रेन क्र. 09114 (बडोदा ते रत्नागिरी)०८/०९/२०२६ आणि २२/०९/२०२६२ फेऱ्या
ट्रेन क्र. 09113 (रत्नागिरी ते बडोदा)०९/०९/२०२६ आणि २३/०९/२०२६२ फेऱ्या
ट्रेन क्र. 09110 (विश्वामित्री ते रत्नागिरी)०९/०९/२०२६१ फेरी
ट्रेन क्र. 09109 (रत्नागिरी ते विश्वामित्री)१०/०९/२०२६१ फेरी
ट्रेन क्र. 09124 (विश्वामित्री ते रत्नागिरी)०७/०९/२०२६१ फेरी
ट्रेन क्र. 09123 (रत्नागिरी ते विश्वामित्री)०७/०९/२०२६१ फेरी
ट्रेन क्र. 09022 (उधना ते रत्नागिरी)१०/०९/२०२६१ फेरी
ट्रेन क्र. 09021 (रत्नागिरी ते उधना)१०/०९/२०२६१ फेरी
ट्रेन क्र. 09030 (वलसाड ते रत्नागिरी)०७/०९/२०२६१ फेरी
ट्रेन क्र. 09029 (रत्नागिरी ते वलसाड)०८/०९/२०२६१ फेरी

गुजरात व महाराष्ट्र जोडणाऱ्या गाड्यांमुळे परप्रांतीय व स्थानिक चाकरमान्यांना दिलासा

गणेशोत्सवाच्या काळात मुंबई आणि उपनगरांसोबतच गुजरात राज्यातील बडोदा, उधना, वलसाड आणि विश्वामित्री भागातून कोकणात येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने थेट गुजरातवरून रत्नागिरीसाठी विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. यामुळे मुंबई, ठाणे आणि गुजरात भागात वास्तव्यास असणाऱ्या कोकणवासीयांचा गणेशोत्सवातील प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाचे आवाहन

“या सर्व विशेष गाड्यांचे थांबे आणि वेळेबाबतची अधिक माहिती मिळवण्यासाठी प्रवाशांनी रेल्वेच्याwww.enquiry.indianrail.gov.inया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.”

सुनील बी. नारकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:06 15-08-2026