रत्नागिरी : अकरावी प्रवेशाबाबत उबाठा ठाकरे युवासेना करणार आंदोलन

रत्नागिरी : दहावीचा निकाल लागून तीन महिने उलटून गेले तरी अद्याप काही विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून वंचित आहेत. या प्रकाराबाबत पालक आणि विद्यार्थिवर्गात असंतोषाची लाट पसरली असून, जर ही निकालाची प्रक्रिया आठ दिवसांत पूर्ण झाली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेच्यावतीने जिल्ह्यात मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा शिवसेना उपनेते आणि माजी आमदार बाळ माने यांनी दिला आहे.

या वेळी शहर संघटक प्रसाद सावंत उपस्थित होते. जिल्ह्यात आणि राज्यात आजही अकरावी प्रवेशाला अंतिम स्वरूप मिळालेले नाही. रत्नागिरी विधानसभा मतदार संघाचा विचार केला तर आजही रत्नागिरी शहरात ५००, तर ग्रामीण भागातही सुमारे ५०० विद्यार्थी आजही प्रवेशापासून वंचित आहेत. राज्य शासनाने अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेचा निर्णय घेतला. त्याचे स्वागतच आहे. त्यामध्ये पारदर्शकता आहे; मात्र आज दहावीचा निकाल लागून तीन महिने उलटून गेले. ५० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला आहे; परंतु ८० टक्के गुण मिळवलेला विद्यार्थी आजही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रवेश न मिळाल्यास आंदोलन युवासेना करणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 AM 25/Aug/2025