डिजिटलचा वापर करताना सतर्कता महत्त्वाची : राजेंद्र चव्हाण

गुहागर : सध्याचे युग हे डिजिटल झालेले आहे. डिजिटल घटकांचा वापर करताना सर्वांनीच सावधानता बाळगून तसेच सतर्क राहून व्यवहार करावेत, अन्यथा मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ शकते, असा सावधानतेचा इशारा एचडीएफसी बँक शृंगारतळीचे शाखा व्यवस्थापक राजेंद्र चव्हाण यांनी दिला.

पाटपन्हाळे महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे ‘बँकिंग क्षेत्रातील बदल’ या विषयावर आयोजित कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी यावर्षीच्या वाणिज्य मंडळातील पदाधिकाऱ्यांचे राजेंद्र चव्हाण यांनी स्वागत केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. ए. देसाई, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष खोत, प्रा. कांचन कदम, प्रा. सुभाष घडशी उपस्थित होते. सूत्रसंचालन अमृता आंबेकर, प्रास्ताविक आनंदिता आग्रे व आभार प्रदर्शन ऋतुजा भेकरे हिने केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 AM 25/Aug/2025