अडरे : चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील विठ्ठलवाडी गणेश मित्रमंडळातर्फे बुधवार दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते १ या वेळेत चिपळूण मधील श्री हॉस्पिटलच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष व जिल्हा प्रशासन रत्नागिरी यांच्या समन्वयाने आरोग्य अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
खेर्डीतील विठ्ठलवाडी गणेश मित्रमंडळ यावर्षी गणेशोत्सवाचे १२ वे वर्ष साजरे करत आहे. मंडळाचे आधारस्तंभ दशरथ दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली २०१४ मध्ये या मंडळाच्या स्थापनेपासून मंडळ सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत आहे. दिवाळीत आदिवासी पाड्यावर जाऊन फराळ व नवीन कपडे देऊन दिवाळी साजरी करणे, वृक्षारोपण करणे, विसर्जन घाटाची साफसफाई असे उपक्रम राबवत आहे.
कोरोनाच्या काळात मंडळाने औषध व जेवणाची सोयही केली होती. त्याचाच एक भाग म्हणून या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खेर्डी व परिसरातील ग्रामस्थांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विठ्ठलवाडी गणेश मित्रमंडळाने केलेआहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 PM 03-Sep-2025










