Ratnagiri : दुचाकी चोरीप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी : तालुक्यातील खालगाव-जाकादेवी, पोचरीफाटा येथून दुचाकी चोरून नेल्याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (ता. ३) सकाळी सात ते साडेबाराच्या या कालावधीत खालगाव जाकादेवी पोचरीफाटा येथे घडली.

श्रीराज प्रसाद सावंत व राजेंद्र राजन शिर्के (दोन्ही रा. मांजरे देसाईवाडी, ता. संगमेश्वर) अशी संशयितांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रघुनाथ सखाराम गोताड (वय ७१, रा. खालगाव, जाकादेवी पोचरीफाटा, रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयितांनी गोताड यांची १० हजार रुपये किंमतीची दुचाकी ही त्यांच्या संमतीशिवाय चोरून नेली. पोलिसांनी संशयित श्रीराज सावंत व राजेंद्र शिर्के यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 08/Sep/2025