सोलापूर : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका व्यासपीठावर येऊन पुत्र आदित्य ठाकरे यांच्या डोक्यावर हात ठेवावा आणि शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना पन्नास खोके मिळाल्याचे सांगावे आणि मी पण माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो, की आम्हाला पन्नास खोके कोणाकडूनही मिळाले नाहीत. एकदा महाराष्ट्रातील जनतेसमोर सोक्षमोक्ष होऊनच जाऊ द्या, अशा शब्दांत सांगोल्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आयुष्यावर आधारित ‘मला काही सांगायचंय’ हे नाटक लवकरच येत आहे. त्यास प्रत्युत्तरादाखल शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडूनही ‘पन्नास खोके-एकदम ओके’ नावाचे नाटक आणण्याची तयारी सुरू आहे. त्यावरून ठाकरे व शिंदे गटात पुन्हा वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:29 21-09-2024