Ratnagiri : रिक्षामध्ये चक्कर येऊन पडलेल्या प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी : रिक्षातून प्रवास करीत असताना अचानकणे चक्कर येऊन पडलेल्या प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना सोमवार १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.४५ वा. सुमारास घडली. सुनील गोणक नावले (वय ५५, रा. मूळ रा. निरुळ ठिकवाडी सध्या रा. ओम मँन्टॅन्यू बिल्डिंग, रत्नागिरी) असे आकस्मिक मृयू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.

सोमवारी सायंकाळी ते काही कामानिमित्त रिक्षाने प्रवास करत होते. रिक्षामध्ये चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने रिक्षा चालकाने त्यांना ते रहात असलेल्या बिल्डिंगमधील शिंदे यांच्या दुकानासमोर आणून ठेवले. त्यानंतर सुनील नावले यांना पोलिसांच्या जिपमधून जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 AM 17/Sep/2025

Shanti real estate 1