जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत पाली हायस्कूलच्या करण बेहरेला सुवर्णपदक

पाली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्याद्वारे आयोजित जिल्हास्तरीय शालेय रायफल शुटिंग क्रीडा स्पर्धा एस. व्ही. जे. सी. टी. क्रीडा संकुल,डेरवण, ता. चिपळूण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. यामध्ये मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज पालीचा विद्यार्थी करण संतोष बेहेरे, इयत्ता दहावी अ याने १७ वर्षाखालील ओपन साईड रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये २४३ गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त करत सुवर्णपदक पटकावले आहे. करण बेहेरे याची कोल्हापूर विभागीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या यशाबद्दल त्याचे पालकमंत्री उदय सामंत, सिंधुरत्न समृद्ध योजनेचे सदस्य किरण सामंत,रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रामचंद्र गराटे, शिवसेना पाली जि.प.गट विभागप्रमुख सचिन सावंत, सरपंच विठ्ठल सावंत, उपसरपंच संतोष धाडवे, मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पालीचे प्राचार्य सुदेश कांबळे, पर्यवेक्षक नम्रता गोगटे, क्रीडाशिक्षक तुफील पटेल व सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 23/Sep/2024
📰➖♾️➖♾️➖♾️➖📰