Chiplun : विशाल गोवळकरच्या शिल्पाला राज्यात द्वितीय पारितोषिक

चिपळूण : पन्हाळा येथे आयोजित राज्यस्तरीय चित्रकला व शिल्पकला स्पर्धेत सावर्डे येथील सह्याद्री स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी विशाल गोवळकर याला द्वितीय क्रमांक मिळाले. पन्हाळा गिरिस्थान आणि नगरपालिका यांच्या वतीने आयोजित चित्रकला व शिल्पकला स्पर्धा उत्साहात झाली.

स्पर्धेत सह्याद्री स्कूल ऑफ आर्टच्या विशाल गोवळकरने उत्कृष्ट कला सादर करत शिल्पकला खुला गट या विभागातून द्वितीय पारितोषिक मिळविले. त्याला ११ हजार १११ रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. यशस्वी विशाल गोवळकर विद्यार्थ्यांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम संस्थेचे सेक्रेटरी महेश महाडिक, ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के प्राचार्य माणिक यादव आदींनी त्याचे कौतुक केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 02/Oct/2025

Naadi pariksha