Chiplun : वन विभागाच्या फोटो गॅलरी कम कॉन्फरन्स हॉलचे आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी : वन विभागाने जिल्हा नियोजन योजना २०२४-२५ अंतर्गत केलेल्या फोटो गॅलरी कम कॉन्फरन्स हॉलचे उद्घाटन आज (३ ऑक्टोबर) सायंकाळी ७ वाजता उद्योगमंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते विभागीय वन अधिकारी कार्यालय, प्रभात रोड, मार्कडी चिपळूण येथे होणार आहे.

यावेळी गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम, खासदार सुनील तटकरे, नारायण राणे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, निरंजन डावखरे, भास्कर जाधव, शेखर निकम, किरण सामंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विभागीय वनअधिकारी गिरीजा देसाई आणि सहायक वनसंरक्षक प्रियांका लगड यांनी दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 AM 03/Oct/2025

Naadi pariksha