Ratnagiri : मेर्वी मराठी शाळेत महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत महात्मा गांधीजी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेस, तर उपशिक्षिका सौ. संजया पावसकर यांच्या हस्ते माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शालेय मंत्रीमंडळाचे मुख्यमंत्री मैत्रेयी अभ्यंकर, उपमुख्यमंत्री रचित म्हादये आणि शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त भाषणे केली. त्यानंतर उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनातील प्रसंग आपल्या मार्गदर्शनातून कथाकथन केले.

हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मेर्वी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश म्हादये, मुख्याध्यापिका सौ. शर्वरी करगुटकर, पदवीधर शिक्षक हिदायत भाटकर, उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर, उपशिक्षिका सौ. संजया पावसकर आदिंचे उत्तम सहकार्य लाभले. उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 03/Oct/2025