ST Bus Live Location App : दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘आपली एसटी’ नवे मोबाईल अॅप सुरू…

मुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘आपली एसटी’ हे नवे मोबाईल अॅप सुरू केले आहे. त्यामुळे प्रवाशांना एसटी बस कुठे आहे, हे समजणार आहे. राज्यातील १२ हजारांहून अधिक बस व १ लाखाहून अधिक मार्गाचे मॅपिंग करून हे अॅप विकसित करण्यात आले आहे.

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी अॅपला ‘आपली एसटी’ हे मराठमोळे नाव दिले आहे. पूर्वी ‘कम्युटर अॅप’ म्हणून असलेले हे अॅप आता नव्या स्वरूपात उपलब्ध आहे. कोविडपूर्व काळातच बसमध्ये जीपीएस बसवण्याचे व ट्रॅकिंगसाठी अॅप तयार करण्याचे नियोजन झाले होते. आता ते प्रत्यक्षात आले आहे.

अॅपच्या मदतीने बस कोणत्या थांब्यावरून सुटणार आणि प्रवाशांच्या थांब्यापर्यंत पोहोचायला किती वेळ लागेल, याची माहिती मिळणार आहे. अॅपमध्ये अँड्रॉइड व अॅपल वापरकर्त्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध आहेत.

यात जवळचा बसथांबा शोधणे, दोन थांब्यांदरम्यान चालणाऱ्या बसचे वेळापत्रक पाहणे, आरक्षित तिकिटावर असलेल्या बस क्रमांकाद्वारे थेट बसचा मागोवा घेणे, या बाबींचा समावेश आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आपत्कालीन क्रमांकांची यादीदेखील अॅपमध्ये उपलब्ध असून, एका क्लिकवर थेट

असे कळेल बसचे ठिकाण

तिकिटावरील ट्रिप कोड अॅपमध्ये टाकताच बसचे सध्याचे लोकेशन पाहता येईल. शिवाय त्याच मार्गावरील इतर गाड्या, त्यांचे वेळापत्रक व थांबे यांची माहितीही मिळणार आहे.

मुंबई सेंट्रल येथील मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून या यंत्रणेवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. सध्या १२ हजार बसमध्ये हे तंत्रज्ञान बसवले असून, उर्वरित बसमध्ये लवकरच बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:16 PM 03/Oct/2025