Lanja : बिबट्याच्या हल्लात दोन वासरे जखमी तर एक पाडा ठार

लांजा : लांजा तालुक्यातील खेरवसे ढववाडी येथे शुक्रवारी मध्यरात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन पाळीव जनावरे जखमी तर एक पाडा ठार झाल्याची घटना घडली. खेरवसे येथील सुरेश कोकरे या शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. गुरांच्या गोठ्यात शिरून बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन वासरे जखमी तर एक पाडा ठार झाला. खेरवसे परिसरात गेली अनेक दिवस बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 04/Oct/2025

Shanti 3