Ratnagiri : राज्यस्तरीय शॉर्ट फिल्म स्पर्धेमध्ये जिल्ह्यात ‘उमलती कळी’ प्रथम

चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शॉर्ट फिल्म स्पर्धेमध्ये राधा-गोविंद फाउंडेशन सावर्डे निर्मित मंगेश डोंगरे दिग्दर्शित ‘उमलती कळी’ या शॉर्ट फिल्मने रत्नागिरी जिल्ह्यामधून प्रथम क्रमांक पटकावला.

या स्पर्धेमध्ये राज्यभरातून ३०० हून अधिक शॉर्ट फिल्म सहभागी झाल्या होत्या. या यशाबद्दल आमदार शेखर निकम यांनी या शॉर्ट फिल्ममध्ये काम केलेल्या सर्व कलाकारांना सन्मानित करून कौतुकाची थाप दिली. यावेळी माजी सभापती पूजा निकम, ज्येष्ठ नेते दादा साळवी, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष समीर काझी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्ष देवराज गरगटे, सह्याद्री शिक्षण संस्था सचिव महेश महाडिक, भूविकास बँकेचे माजी उपाध्यक्ष अजित कोकाटे, विजय भुवड, डॉ. कृष्णकांत पाटील, शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शक मंगेश डोंगरे आणि सर्व कलाकार मंडळी उपस्थित होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:03 PM 04/Oct/2025

Radhakrushna patapedhi