Guhagar : गुहागर मच्छी मार्केट समस्यांच्या गर्तेत

गुहागर : गुहागर नगरपंचायत क्षेत्रातील मच्छी मार्केट गेली अनेक वर्षे दुरवस्थेत आहे. मच्छी मार्केटला अनेक समस्यांनी घेरले आहे. त्यामुळे मच्छी मार्केटची देखभाल नगरपंचायतीकडून व्हावी, अशा मागणीचे निवेदन येथील गुहागर नगरपंचायतीला देण्यात आले. प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे यांनी निवेदन स्वीकारले.

या निवेदनात म्हटले आहे की, मच्छी मार्केटच्या शेजारी तलाव आहे. या तलावाच्या सभोवती यापूर्वी ग्रील होते. मात्र नगरपंचायतीकडून ते काढून टाकण्यात आले. हे ग्रील पुन्हा बसवण्यात यावेत, मच्छी मार्केटमध्ये जो पाण्याचा साठा होतो त्या पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य ते नियोजन करावे, तसेच मार्केटमध्ये विजेची व्यवस्था करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

यावेळी नगरपंचायतीचे माजी विरोधी पक्षनेते उमेश भोसले, माजी महिला तालुकाध्यक्षा श्रद्धा घाडे, माजी नगरसेविका ज्योती परचुरे, संजय मालप, भाजपा तालुका सरचिटणीस संतोष सांगळे, माजी सभापती दीप्ती अजगोलकर, श्रीधर नाटेकर, मच्छी विक्रेते उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 AM 06/Oct/2025

Mahrashi karve ANM