Rain : गतवर्षीपेक्षा यंदा कोकणात १२ टक्के कमी पाऊस

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात १ जून ते ५ ऑक्टोबर या चार महिन्यात पावसाने दमदार बॅटींग केली असून सरासरी ३ हजार ७६८.७२ मि.मी. पाऊस झाला आहे तर ११२.२ टक्के पावसाची नोंद झाली आहे तर गतवर्षी याचकालावधीत ४ हजार १९८.४६ पर्जन्यमान झाले तर १२४.८० टक्के इतका पाऊस झाला आहे. एकंदरित, चार महिन्यात यंदा कोकणात तब्बल १२ टक्के पर्जन्यमान कमी झाल्याची नोंद आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात यंदा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले होते. रत्नागिरीच्या इतिहासात मे महिन्यात एवढा पाऊस पडलाच नव्हता तेवढा पाऊस मे महिन्यात झाला. जून महिन्यात मान्सून कोकणात दाखल झाला.

जून, जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली, तर ऑगस्ट महिन्यात खऱ्या अथनि पावसाने हाहाकार माजवलेला पहायला मिळाला. यामुळे जिल्ह्यातील तब्बल चार ते सहा नद्यांनी धोक्याची, इशारा पातळी ओलांडली होती. जिल्ह्यावर पूरपरिस्थिती ओढवल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालयांना दोन दिवस सुट्टी देण्यात आली होती. त्यानंतर पावसाचा जोर ओसरला.
या वर्षीच्या पावसळ्यातील चार महिन्यात तब्बल १० कोटींहून अधिक नुकसान झाले. रस्ते खराब झाले, दरड कोसळली, जीवित हानी झाली, घरे पडली, शाळा, महाविद्यालयांचे नुकसान झाले. सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवात पावसाचा जोर होता त्यानंतर नवरात्रोत्सवात काहीअंशी पाऊस झाला.

त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात पावसाचा जोरपूर्णपणे ओसरला असून पावसाची रिपरिप अजून देखील आहे. सप्टेंबर महिन्यात कोकणाचा पाऊस मराठवाडा, विर्दभ, सोलापूर जिल्ह्यात गेल्यामुळे त्याठिकाणी अतिवृष्टी, पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. एकंदरित, गतवर्षाच्या तुलनेत यंदा रत्नागिरी जिल्ह्यात १२ टक्के पर्जन्यमान कमी झाले आहे.

Yash siddhi

सर्वाधिक पाऊस
खेड तालुक्यात १२६ टक्के तर चिपळुणात ११८ टक्के तर सर्वात कमी मंडणगडात ९६.८८ टक्के इतका पाऊस झाला आहे. मंडणगड वगळता सर्वच तालुक्यात शंभर टक्क्याहून अधिक पावसाची बरसात झाली आहे.

१० कोटींहून अधिक नुकसान
रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सार्वजनिक मालमत्ता, शाळा, महाविद्यालय, अंगणवाडी, घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकूण १० कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. तसेच रस्त्यांचे ही कोट्यावधींचे नुकसान झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 PM 06/Oct/2025