स्वरूपानंद पतसंस्थेचे अर्थकारण आदर्श आर्थिक शिस्त प्रमाणबद्धता राखणारी ही दुर्मिळ संस्था – आ. प्रविण दरेकर

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अर्थकारण आदर्शवत आहे. संस्थेच्या कामकाजात असलेले सातत्य, आर्थिक शिस्त आणि प्रमाणबद्धता हा विषय दुर्मिळ आहे. सोमवारी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयास आ.प्रविण दरेकर यांनी सदिच्छा भेट दिली. त्या प्रसंगी आ.प्रविण दरेकर हे राज्य सहकार संघाचे अध्यक्ष झाले, पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून दरेकर साहेबांची नियुक्ती झाली व मंत्रिपदाचा दर्जा त्यांना देण्यात आला. या पार्श्वभूमीवर दरेकर साहेबांचा सत्कार स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांनी शाल, देवी लक्ष्मीची प्रतिमा आणि बुके देऊन केला.

संस्थेला भेट देऊन संस्थेच्या व्यवहारांची माहिती त्यांनी घेतली. संस्थेची उत्तम वसुली, दणदणीत स्वनिधी, संस्थेचा निव्वळ नफा या संदर्भाने ॲड.दीपक पटवर्धन यांचे खास अभिनंदन दरेकर यांनी केले.

संस्थेच्या काही मागण्या कर्ज मर्यादा वाढ, पोट नियम दुरुस्ती या संदर्भाने असलेल्या अडचणी समजावून घेऊन श्री.दरेकर यांनी थेट आयुक्तांबरोबर चर्चा केली व संस्थेच्या मागण्या मान्य कराव्यात असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

आ.श्री.प्रविण दरेकर यांच्या सत्कारासाठी उपाध्यक्ष श्री.माधव गोगटे, संचालक श्री.अजित रानडे, श्री.लेले सर आदी संचालक उपस्थित होते. तसेच श्री.मुन्ना चवंडे, श्री.सचिन करमरकर, श्री. राजू तोडणकर हे सुद्धा उपस्थित होते.

Tata motars punch

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 AM 07/Oct/2025