OBC : आझाद मैदानावर ९ ला कुणबी एल्गार मोर्चा

खेड : ओबीसींचे अस्तित्व टिकवण्यासह ओबीसीच्या न्यायहक्कांसाठी ९ ऑक्टोबर रोजी मुंबई येथील आझाद मैदानात कुणबी समाजोन्नती संघाच्यावतीने कुणबी एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे.

ओबीसींचे आरक्षण हिरावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांशी आता कोणतीही चर्चा न करता थेट तमाम कुणबी समाजबांधवांच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात तालुक्यातील कुणबी समाजबांधवांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कुणबी समाजोन्नती संघाचे युवा अध्यक्ष सुरेश जोगळे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 07-10-2025

Infigo Eyecare