Ratnagiri : यावर्षी दिवाळीत आनंदाचा शिधा मिळणार का ?

रत्नागिरी : यंदाच्या वर्षी गौरी-गणपतीत आनंदाचा शिधा वितरीत झाला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी मोठा संताप व्यक्त केला होता. दरम्यान, दिवाळी सण अवम्याच काहीच दिवसांवर आला आहे. दिवाळीत आनंदाचा शिधा वाटपा संदर्भात शासनाकडून अद्याप कोणत्याच हालवाली दिसत नाही. शिधा वाटपाबाबत रानागिरीच्या जिल्हा पुरवठा विभागास शासनाकडून कोणतेही आदेश, पत्र आलेले नाही. त्यामुळे गौरी-गणपतीनंतर दिवाळीत ही आनंदाचा शिधा मिळण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे.

गोरगरिबांना सण आनंदात साजरा करता घावे म्हणून १०० रूपयात दिवाळी, जयंती, उत्सवासाठी महायुतीच्या काळात आनंदाचा शिधा देण्यास सुरुवात झाली. या शिधामध्ये रवा, साखर, चणाडाळ, पामतेल, मैदा असे पाच जिनस दिले जात होतो. मागील दोन ते तीन वर्षांपासून आनंदाच्या शिधा कीटचे वाटप केले जात होते. येथील गोरगरीब, लाभार्थ्यांना त्याचा मोठा आधार होता. त्यामुळे सण ही मोठ्या उत्साहात साजरा होत होता.

सणानिमित राज्यातील जनता आनंदाच्या शिध्याची वाट पाहत आहेत. दिवाळी येत्या १७ ऑक्टोबरपासून सुरूवात होईल, राज्यातील कित्येक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पूर आल्यामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. लांबलेला पावसामुळे शेतकऱ्यांचेशी मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा तरी शिध्याचे वाटप व्हावे, अशी मागणी लाभार्थी करीत आहेत.

लाडकी बहीण योजनेमुळे सरकारचा पैसा खर्च होत त्यास प्रमाणे शिवभोजन योजनेचा शासकीय तिजोरीवर ताण पडलेला असल्यामुळे आता आनंदाच्या शिष्याला याचा फटका बसत आहे.

ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याचे धान्य वाटप
जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्याचे धान्य एकाच वेळी देण्याचे आदेश होते. रत्नागिरी जिल्ह्यात दोन महिन्याचे धान्य वाटप करण्यात आले होते. मात्र, ऑगस्ट महिन्याचे धान्य राहिले होते. पॉस मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे धान्य वाटपात अडचण येत होती. आता ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याचे धान्य वाटप झाले असल्याचे सांगण्यात आले.

दिवाळी सणानिमित्त आनंदाच्या शिध्याबात अद्याप शासनाकडून कुठलाही शासन निर्णय आला नाही. त्याबाबत आताच काही सांगू शकणार नाही. शिधा वाटपासंदर्भात आदेश आल्यास योग्य ते नियोजन करू, आता काहीच सांगता येणार नाही- रोहिणी रजपूत, जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:14 PM 07/Oct/2025