Uday Samant : उद्योगवाढीसाठी मंत्री उदय सामंत जर्मनी दौऱ्यावर; आज म्युनिकला पोहोचणार, स्टटगार्ट येथे मुक्काम

म्युनिक (जर्मनी) : महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे दोन दिवसांच्या महत्त्वपूर्ण जर्मनी दौऱ्यावर आहेत. राज्याच्या उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि विविध औद्योगिक भागीदाऱ्यांसाठी ते हा दौरा करत आहेत.

आज, दिनांक ८ रोजी, सामंत हे भारतीय वेळेनुसार दुपारी ४ वाजता जर्मनीतील म्युनिक शहरात पोहोचतील. म्युनिक येथून ते थेट स्टटगार्ट शहराकडे रवाना होतील, जिथे त्यांचा मुक्काम असणार आहे.

दौऱ्याच्या पहिल्या दिवशी, उद्या सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत, ते उद्योग विभागाच्या विविध परिषदांना (conferences) उपस्थित राहून महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधी आणि औद्योगिक धोरणांवर चर्चा करतील.

सायंकाळी ६ वाजता, उदय सामंत हे महाराष्ट्र मंडळाच्या बैठकीत सहभागी होतील. या बैठकीत जर्मनीतील मराठी बांधवांशी संवाद साधून राज्याच्या विकासासाठी त्यांच्या सूचना आणि सहकार्याबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे.

Arihant 3

दोन दिवसांचा दौरा आटोपून ते दिनांक १० रोजी मायदेशी परतण्यासाठी रवाना होतील. महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण औद्योगिक गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 08-10-2025