साडवली : दीपावलीनिमित्त देवरूखमध्ये कलारसिकांसाठी सरस्वती अॅकॅडमीतर्फे चित्रप्रदर्शन आणि चित्रकला कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. चित्रप्रदर्शन २५, २६ आणि २७ ऑक्टोबरला सकाळी ९ ते १.३० आणि सायंकाळी ४ ते ८ या वेळेत रसिकांसाठी खुले असणार आहे. हे प्रदर्शन स्वामी समर्थ मंदिराजवळील गाळा नं. ३० मध्ये भरवण्यात येणार आहे. प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत नामवंत चित्रकार प्रवीण हर्डीकर (देवरूख) यांची चित्रे.
त्यांच्यासोबत सहभागी कलाकार म्हणून दीक्षा सागवेकर, सुरेंद्र (भाऊ) शिंदे आणि किशोर भाट्ये यांच्या कलाकृतींचाही समावेश असणार आहे. यासोबतच विशेष आकर्षण म्हणजे चित्रकला कार्यशाळा दररोज दुपारी १.३० ते सायंकाळी ४ दरम्यान घेण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी १५ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश निश्चित करावा. नोंदणीसाठी दीक्षा सागवेकर हिच्याशी संपर्क साधावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 09/Oct/2025














