Ratnagiri : चाफे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची समुद्रकिनारे स्वच्छता मोहीम

जाकादेवी : चाफे येथील मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालयातील एन. एस. एस. विभागाचे विद्यार्थी व देवस्थान कर्मचाऱ्यांनी गणपतीपुळे समुद्रकिनारा स्वच्छ केला. विद्यार्थ्यांनी देवस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने श्रींच्या अवतीभवती असलेल्या अथांग सागर किनारा स्वच्छ केला.

समुद्र किनाऱ्यानजीक असलेला सुका कचरा, ओला कचरा आणि प्लास्टिकचे व्यवस्थापन केले. यानंतर हे सर्व विद्यार्थी जयगड समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले आणि तेथील स्थानिक नागरिकांच्या व ग्रामस्थांच्या मदतीने समुद्र किनारा स्वच्छ केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 09/Oct/2025