रत्नागिरी : बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेतर्फे रत्नागिरीत लेडिज ब्युटी पार्लर प्रशिक्षण २७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या ३५ दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणात आयब्रो, वॅक्स, फेशियल, ब्लीच हेड मसाज, मेनिक्युअर, पेडिक्युअर, हेअरस्टाईल, हेअरकटिंग, हेअर कलरिंग, हेअर स्ट्रेटनिंग, हेअर स्पा, मेहंदी, साडी नेसण्याचे विविध प्रकार, ब्रायडल मेकअप् इत्यादी शिकवण्यात येणार आहे. हे मोफत प्रशिक्षण असेल. चहानाश्ता, जेवण, राहण्याची मोफत सोय करण्यात येणार आहे. तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे.
उद्योजकता व व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण शासनमान्य प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी वयोमर्यादा १८ ते ४५ वर्षांपर्यंत आहे. उमेदवार रत्नागिरी जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. उमेदवार उमेद बचतगटातील सदस्य किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती तसेच अल्प उत्पन्नगटाचा असल्यास प्राधान्य देण्यात येईल. प्रशिक्षण सकाळी साडेनऊ ते साडेपाचपर्यंत असणार आहे. नोंदणीसाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, त्याच्या प्रत्येकी झेरॉक्स फोटो अशा कागदपत्रांसह उमेदावारांनी स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, निसर्ग वसाहत शांतिनगर, वक्रतुंड अपार्टमेंटजवळ, नाचणे रोड येथील कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 11/Oct/2025














