Lanja : बामणेचाळ येथे बेकायदा गावठी दारू बाळगणाऱ्यावर गुन्हा

रत्नागिरी : लांजा तालुक्यातील बामणेचाळ येथे बेकायदेशीरपणे गावठी दारूची बाळगणाऱ्या संशयितांविरोधात लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.१५ वा. सुमारास करण्यात आली. जितेंद्र शिवराम कांबळे (वय ४०, रा. गवाणे बौद्धवाडी लांजा, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस कॉन्स्टेबल उमाजी बजागे यांनी तक्रार दिली आहे.

शनिवारी सायंकाळी संशयित हा आपल्या ताब्यात गावठी हातभट्टीची २ हजार १०० रुपयांची २० लिटर दारू विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 13/Oct/2025

Samarth gold