Devrukh : आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या मुलींचा संघ खो-खो स्पर्धेत करणार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व

देवरूख : शहरातील आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाचा मुलींचा संघ कोल्हापूर विभागीय शालेय खो-खो स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या वतीने डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट क्रीडा संकुल येथे नुकत्याच जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धा झाल्या. या स्पर्धेच्या १९ वर्षांखालील मुलींच्या गटात आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाने रत्नागिरी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघावर रोमहर्षक विजय मिळवून विजेतेपद प्राप्त करून गत यशाची परंपरा कायम राखली आहे.

मुलींच्या यशस्वी खो-खो संघात दिव्या सनगले, दीपाली सनगले, प्रीती सनगले, सानिका सनगले, सिद्धी चोरगे, सिद्धी पर्शराम, स्नेहा गावडे, सृष्टी आग्रे, पूर्वा टक्के, श्रुती किंजळे, सानिका आग्रे, अक्षरा कांबळे, पूर्वा वेद्रे यांचा समावेश आहे. यशस्वी खेळाडूंचा संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, सुजाता प्रभूदेसाई, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे यांनी कौतुक करत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 AM 14/Oct/2025

Mahrashi karve ANM