Khed : नातूनगर येथे प्रौढाकडे सापडली देशी बनावटीची दारु

खेड : देशी बनावटीची दारु बिगरपरवाना स्वतः जवळ बाळगल्याप्रकरणी खेड पोलिसांनी संजय लक्ष्मण शिंदे (वय ४३, रा. नातूनगर – मोरेवाडी, खेड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई रविवारी सायंकाळी नातूनगर – मोरेवाडी येथे करण्यात आली.

याप्रकरणी खेड पोलिस स्थानकाचे कॉन्स्टेबल शरीष साळुंखे यांनी फिर्याद दिली आहे. या कारवाईत ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरु आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:44 PM 14/Oct/2025

Mahrashi karve ANM