Sangameshwar : माहारण प्रकरणी उपसरपंचांसह सातजणांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी : जलजीवन आणि पाणलोट योजनेच्या निधीबाबत प्रश्न केला म्हणून ५२ वर्षीय प्रौढाला व त्याच्या पत्नीला मारहाण करण्यात आल्याची घटना रविवार १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी कुरण बागवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी उपसरपंचांसह सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिंगणीचे उपसरपंच मिथुन निकम, स्वप्नील सुर्वे आणि अन्य पाच अनोळखी व्यक्ती यांच्यावर बेकायदा जमाव करुन मारहाण केल्याबद्दल संगमेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दीपक राऊत (डिंगणी कुरण बागवाडी) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. जलजीवन मिशन आणि वसुंधरा पाणलोट योजनेचा निधी कोठे खर्च झाला, याचा हजिशेब ग्रामपंचायतीच्या सभेत द्या, असे आपण मिथुन निकम यांना फोनवरुन सांगितले. त्या रागातून त्यांनी स्वप्नील सुर्वे आणि अन्य पाच लोकांसह आपल्या घरात घुसून आपल्याला मारहाण केली. मारहाण थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या पत्नीलाही त्यांनी मारहाण केली, असे राऊत यांनी आपल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. संगमेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:56 PM 14/Oct/2025

Naadi pariksha