लांजा : लांजा बाजारपेठ येथे सापडलेले पाकीट आणि रोख रक्कम मूळ मालकाला परत करून चाफेट-नेमणवाडी येथील कान्होजी जाणू नेमण यांनी आपल्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले. गवाणे-रेवाळेवाडी येथील रूपेश बापू रेवाळे हा तरुण १३ ऑक्टोबरला दुचाकीने लांजा येथे आला होता; मात्र गडबडीत दुपारी १२.३० वाजता बाजारपेठेत पाकीट पडले होते.
हे पाकीट चाफेट-नेमणवाडी येथील कान्होजी नेमण यांना सापडले होते. या पाकिटात तीन हजार रुपये, वाहन परवाना, आधारकार्ड, पॅनकार्ड होते. हे पाकीट लांजा पोलिस ठाण्यात जमा करण्यासाठी दुपारी दोन वाजता गेले होते. त्याचवेळी पाकीट हरवलेला रूपेश रेवाळे पोलिसांकडे पाकीट हरवल्याची तक्रार देण्यासाठी आला होता. पाकिटाची ओळख पटवून कान्होजी नेमण यांनी ते रूपेश रेवाळे यांना दिले. या वेळी पोलिस उपनिरीक्षक संदीप साळुंके, चालक बाबाजी बजागे उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 15/Oct/2025














