Chiplun : साफ यिस्ट कंपनीमध्ये ३० ऑक्टोबरपर्यंत कामगारांना रूजू करण्याचे आश्वासन

चिपळूण : गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीमधील साफ यिस्ट कंपनीने कामगार आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे मंगळवारी २० कामगारांना रूजू करून घेतले. आता टप्प्याटप्प्याने उर्वरित कामगार कंपनीच्या सेवेत रूजू होणार आहेत. त्यामुळे हे उपोषण स्थगित झाले आहे.

रत्नागिरी येथे झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने हा प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाठपुरावा केला. २३० कामगारांना कंपनीने कामावर घेण्यास नकार दिला होता. आ. शेखर निकम यांनी यासाठी पुढाकार घेत कंपनी व्यवस्थापनाबरोबर बैठक घेतली व पहिल्याच टप्प्यात १३० कामगारांना रूजू करून घेण्यात आले. आ. निकम यांनी यासाठी महत्त्वूपर्ण पुढाकार घेत व्यवस्थापनाबरोबर चर्चा केली; मात्र उर्वरित कामगारांना न घेतल्याने कर्मचाऱ्यांनी १४ पासून उपोषणाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर कंपनीने १४ ऑक्टोबर रोजी २०, २० ऑक्टोबरपूर्वी २० आणि उर्वरित ५० कामगारांना ३० ऑक्टोबरपूर्वी रूजू करून घेण्याचे आश्वासन कामगार आयुक्तांना दिले आहे.

कंपनीच्यावतीने आंबेकर व धीरज सावंत उपस्थित होते तर राष्ट्रवादीतर्फे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, अॅड. अमित कदम तसेच कामगार युनियनचे पदाधिकारी शशिकांत खांडके, शंकर भोगटे, रेमंड स्मित, रमेश जोशी, जे. के, युनियनचे वसंत चिपळूणकर, बाबाराम शिंदे, सचिन सकपाळ, विशाल कदम, अमित गजमल, संतोष जाधव, महेश मिसाळ, निलेश गजमल आदी उपस्थित होते. कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी अखेर हा प्रश्न यशस्वीपणे हाताळला. यासाठी आ. शेखर निकम व कामगार संघटनेचे सचिव महेश करकेरा यांनी प्रयत्न केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 15/Oct/2025

tata motars