दापोली : दापोली-खेड राष्ट्रीय महामार्गावर नारगोळी येथील एसटी थांब्याजवळ काल सकाळी रानगवा फिरताना दिसला. महामार्गालगत फिरणाऱ्या या गव्याचे दर्शन झाल्याने प्रवासी व वाहनचालकांमध्ये त्याला पाहण्यासाठी मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.
रानगवा काही वेळ रस्त्यालगत फिरत असल्याने वाहतुकीत थोडा वेळ व्यत्यय आला होता. महामार्गालगतच्या जंगलातून तो बाहेर आला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. ग्रामस्थांनी वनविभागाने तातडीने या परिसरात लक्ष ठेवून आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. वन्यजीव महामार्गावर येण्याच्या घटना अलीकडे वाढू लागल्याने वाहनचालकांमध्येही याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 PM 16/Oct/2025














